Tue. May 28th, 2024

“संविधानासाठी भाजप, आरएसएस घातक, महाविकास आघाडीला पाठिंबा”

Loksabha election 2024 Live Updates Sambhaji Briged

Loksabha Election 2024 Live Updates: भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील लोकशाही आणि संविधानासाठी घातक आहेत. संविधानाचे मूल्य तसेच समतेची विचारधारा जपण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड राज्यात महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस सौरभ खेडेकर यांनी पूर्ण क्षमतेने प्रचार करणार असल्याचे सांगितले. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

संभाजी ब्रिगेडने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. प्रवीण गायकवाड स्वतः महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. तसेच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि नेते प्रचारात उतरणार आहेत अशी ही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केल्याने पश्चिम महाराष्ट्रात मविआची ताकद वाढणार आहे.


आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर जाणून घ्या इथे…

Gold

Read Trending News Here….

Top Loksabha Election 2024 Live Updates..

Edit