Loksabha Election 2024 Live Updates: दुसरा टप्पा, प्रचाराचा आज शेवटचा दिवस
दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज (24 एप्रिल) शेवटचा दिवस आहे. आज विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, अकोला आणि बुलडाणा मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावणार आहेत. या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे.
महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी सुट्टी
महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या रोजी एकदिवस पगारी सुट्टी असणार आहे. याचे शासन परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. ज्या दिवशी जेथे मतदान आहे त्यादिवशी त्या मतदारसंघात सुट्टी असणार आहे. दरम्यान पहिला टप्पा 19 एप्रिल ला पार पडला त्या दिवशीही सुट्टी होती.